पहा व्हिडीओ : ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा RTO कार्यालयातच मृत्यू

विठ्ठल तुळशीराम काळे असं ड्रायव्हिंग टेस्ट देताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. काळे हे आज दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत असताना त्यांचा मृत्यू झाला.
पहा व्हिडीओ : ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा RTO कार्यालयातच मृत्यू

नांदेड : आपण प्रत्येक जण ड्रायव्हिंग टेस्ट (Driving test) देण्यासाठी आरटीओ कार्यालयात (RTO Office) देण्यासाठी जात असतो मात्र अशीच ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी गेलेल्या एका 61 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे.

पहा व्हिडीओ -

विठ्ठल तुळशीराम काळे असं ड्रायव्हिंग टेस्ट देताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. काळे हे आज दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart attack) आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान यावेळी त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या पत्नीने त्यांच्या पतीचे निधन झाल्याचे समजताच अक्षरशः हंबरडा फोडला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com