नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता.
नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली
नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्लीsaam tv

विहंग ठाकूर

नवी दिल्ली : नानांवरती पाळत कोण  ठेवणार, नानांना सरकारी सुरक्षा आहे. त्यामुळे गृहखाते सुरक्षा विषयक  माहिती घेते, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या नाना पटोले (Nana patole) यांनी केलेल्या आरोपाची खिल्ली उडवली आहे. पाळत ठेऊन  पक्ष  वाढतो किंवा कमी होतो असे नाही, त्यांचा गैरसमज  झालाय असे मला कळले आहे, असाही टोमणा राऊत यांनी लगावला आहे. (Patole's claim was ridiculed by Sanjay Raut)

नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली
पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण?

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आरोप दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज संजय राऊत यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

''पाळत ठेवणे' याचे राजकरणात वेगवेगळे संदर्भ आहेत. मलाही राज्यसरकारकडून सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. नाना पटोले नक्कीच या सुरक्षा व्यवस्थेविषयी बोलत असतील. आपण कुठे जातो-येतो, आपल्याला कोणत्या गोष्टीपासून धोका आहे, ही माहिती गृहखात्याकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून दिली जाते,'' असे राऊत याबाबत म्हणाले.

''नाना पटोले हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे, त्यांनी त्यापद्धतीने कामे करावीत. अशी विधाने होत असतात, मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेऊ नये आणि आम्हीसुद्धा घेत नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com