पवार कुटुंबियांवर आणि अनिल देशमुख यांच्यावर पडळकरांची सडकून टीका

सातेवाडी या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार व सुप्रिया सुळे बरोबरच अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका
पवार कुटुंबियांवर आणि अनिल देशमुख यांच्यावर पडळकरांची सडकून टीका
पवार कुटुंबियांवर आणि अनिल देशमुख यांच्यावर पडळकरांची सडकून टीकाSaam Tv

सातारा : सातेवाडी Satewadi या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवार व सुप्रिया सुळे बरोबरच अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका Commentary केली. ही टीका करत असताना, सचिन वाझे प्रकरणाचा संदर्भ देत ते म्हणाले, आम्ही सभागृहात वाझेला सस्पेंड करण्याची मागणी केली. ती मागणी त्यांनी मान्य देखील केली.

हे देखील पहा-

परंतु, बाहेर गेल्यावर कुणीतरी कान Ears पिळल्यावर अचानक करणार नाही, असा पवित्रा घेतला. आज वाझे ना निलंबित केले असते, तर अनिल देशमुखांवर लपून राहण्याची वेळ आली नसती, असे सांगून अनिल देशमुख हे चिल्लर खातात आणि डॉलर पवारांकडे नेहून देतात. पवार नेहमी गरिबाला गृहमंत्री करतात जो चिल्लर खातो आणि डॉलर बारामतीला Baramati देतो.

पवार कुटुंबियांवर आणि अनिल देशमुख यांच्यावर पडळकरांची सडकून टीका
मागासर्गीय पदोन्नती आरक्षणावरून सावळा गोंधळ ; पडळकरांची टीका ( पहा व्हिडिओ )

आर.आर.आबा, अनिल देशमुख ही उदाहरणे देऊन पडळकरांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील या पदासाठी इच्छुक होते. परंतु, पवार दरोडेखोरांना संधी देत नाहीत. अजित पवार २ वेळा रुसून गेले, पण जो माणूस हिशोब जमा करत नाही त्यांना पवार गृहमंत्री कसा करणार?

अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पवारांच्या पापाचा घडा भरत आला, असून तो कधी लवंडेल सांगता येत नाही. यामुळे राष्ट्रवादी NCP Party वाल्यांनी जरा जपून रहा, तुमचा शेवटचा स्टेज हा तुरुंगातच असणार आहे, अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com