...तर जनताच उद्धव ठाकरेंचा अहंकार मोडीत काढेल; रवी राणांचा हल्लाबोल
Uddhav ThackeraySaam TV

...तर जनताच उद्धव ठाकरेंचा अहंकार मोडीत काढेल; रवी राणांचा हल्लाबोल

'शिवसेनेकडून देवदुत असणाऱ्या डॉक्टरांसोबत अरेरावी करण्यात आली त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं.'

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्तेचा अहंकार आला असून जनता त्यांचा हा अहंकार मोडीत काढेल अशी बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाच्या वादावरुन सुरु झालेला राणा विरुद्ध शिवसेना (Rana Vs Shivsena) वाद काही थांबण्याची चिन्ह दिसंत नाहीत. १४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जामीनावरती बाहेर आल्यावर त्यांना शाररीक त्रास सुरु झाल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयात त्यांचा एमआरआय करतानाचा एक फोटो चांगलाच वादग्रस्त ठरला.

तो फोटो लीलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) एमआयआर कक्षातील असल्यामुळे शिवसेना नेत्यांनी थेट लीलावती रुग्णालयात जाऊन या फोटोबाबत डॉक्टरांसह प्रशासनाला जाब विचारला. शिवाय हॉस्पिटल राणा दाम्पत्याला पाठीशी घालत असल्याचा देखील आरोप शिवसेना नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमिवर खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. शिवसेनेकडून हॉस्पिटलमध्ये देवदुत असणाऱ्या डॉक्टरांसोबत अरेरावी करण्यात आली त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं.

Uddhav Thackeray
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फडणवीसांचा खोटारडेपणा उघड; नाना पटोलेंचे टीकास्त्र

तसंच जे शिवसेनेचे नेते लीलावतीमध्ये गेले ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनचं गेले असल्याचंही ते म्हणाले. शिवाय हनुमान चालीसा पठणावरुन एका महिलेवर तुम्ही राजद्रोहाचा गुन्हा टाकला, तुरुंगात टाकलं आणि शेवटी रुग्णालयात देखील त्यांना त्रास दिला. एवढ्यावरच न थांबता ज्या हॉस्पिटलने डॉक्टरांनी कोरोना काळात जनतेची सेवा केली त्यांना मुंबई पालिका नोटीस देते. हा सत्तेचा अहंकार असून तो अहंकार जनता मोडून काढेल असं रवी राणा म्हणाले.

सेना नेत्यांचा रुग्णालयावर आरोप काय -

एखादा रुग्ण MIR कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे MIR स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यावेळी जर रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांच्यासह आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.