Beed: वकिलीच्या प्रकरणात पोलिसांची टक्केवारी? 200 वकिलांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

वकील आणि पोलीस दोघेही लुटतात सामान्य नागरिकांना
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - जिल्ह्यामध्ये पोलीस (Police) आणि वकील यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचं कारणही तसेच आहे. महिला अत्याचार, आणि बाल लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये पोलीस आरोपीला अमुक वकिलाकडे जा, अशी शिफारस करत आहेत. यात पोलीस आणि वकील यांचे आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप बीडच्या (Beed) जवळपास 200 वकिलांनी केला आहे.

त्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पोलीस अधिकारी आणि वकील यांच्यातील भागीदारी विषयी गंभीर आरोप केला आहे. यात अत्याचार प्रकरणात काम करणाऱ्या पिंक मोबाईल पथकाच्या - पीएसआय मिना तुपे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे.

यामुळे खळबळ उडाली असून नेमका बीडमध्ये काय सूरू आहे ? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.तर पोलिस आणि वकील सामान्य लोकांची लूट करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे देखील पाहा -

मी सांगेल त्याच वकीलाकडे काम द्या, मी सांगितलेल्या वकीलांना काम दिले नाही, तर तुम्हाला प्रकरणात शिक्षा येईल किंवा तुमचा जामीन अर्ज नामंजुर होईल ". यासह मी तुम्हाला तपासात सहकार्य करणार नाही, आरोपीची जामीन होऊ देणार नाही. अशा प्रकारचा दबाव पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे आरोपी व त्यांच्या नातेवाईकांवर टाकत आहेत. असा गंभीर आरोप वकीलांनी केला आहे.. तसंच हे सर्रास सुरू असून यामुळे कायद्याची पायमल्ली होत आहे, हे थांबवा अशी मागणी वकील यांनी केली आहे.

अपघातांच्या प्रकरणातही पोलीस हे मर्जीतील वकीलांची नावे सुचवतात. कित्येक अपघातांच्या प्रकरणामध्ये दावे न्यायालयात दाखल केले जातात. अशा प्रकरणातही पोलीस अधिकारी व तपासी अधिकारी अर्थाजनासाठी त्यांच्या मर्जीतील विशिष्ट वकीलांचीच नावे सुचवतात.

म्हणजे त्यांना त्याच वकीलांकडे काम द्यावे म्हणून आग्रह करतात, दबाव टाकतात. विशेष म्हणजे सदर कर्मचारी तपासी अंमलदार हे त्या प्रकरणात वकीलांसोबत भागिदारी करतात. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने वकीली पेशाचे नुकसान होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Beed News
Bhopal EOW Raid: पगार हजारात अन् संपत्ती करोडोंमध्ये... खासदाराच्या क्लर्कचे रहस्य उघड

वकील संघाच्या 200 वकिलांनी दिलेल्या तक्रारी अर्ज संदर्भात व निवेदना संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना विचारले असता, हा खूप छोटा विषय आहे. यासंदर्भात काय प्रतिक्रिया द्यायची, असे म्हणत बोलण्यास नकार दिला. या संदर्भात आरोप असलेल्या पीएसआय मनिषा तुपे यांना विचारले असता, या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही. असे म्हणून बोलणे टाळले.

दरम्यान एकीकडे वाढते महिला वरील अत्याचार, खून,चोरी दरोडे, मारामाऱ्याचे प्रकार वाढत असताना, दुसरीकडे कायद्याचे रक्षक म्हणून घेणारे वकील आणि पोलीस एकमेकात भांडून, स्वतःची तिजोरी भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा चित्र दिसून येत आहे.त्यामुळे नेमकं सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस आणि वकील भागीदारीने सर्वसामान्यांची लूट करत आहेत का ? हा देखील खरा प्रश्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com