ओबीसी आरक्षण याचिकाकर्ता म्हणतो 'मी काँग्रेसचाच'...

स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
ओबीसी आरक्षण याचिकाकर्ता म्हणतो 'मी काँग्रेसचाच'...
ओबीसी आरक्षण विरोधी याचिकाकर्ता म्हणतो 'मी काँग्रेसचाच'...कैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद - सध्या महाराष्ट्राचं राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष यावरून आंदोलन करत आहेत व एकमेकांच्या विरोधकांना हे आरक्षण जाण्यास जबाबदार ठरवत आहेत. स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. Petitioner against OBC reservation says 'I belong to Congress'

हे देखील पहा -

राजकीय नेतेमंडळींकडून ओबीसी आरक्षणाचा अक्षरशः फ़ुटबॉल करण्यात आला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारवर तर विरोधकांकडून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. सोबतच,याचिकाकर्त्यांवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र आता याचिकाकर्ते विकास गवळी यांनीच या बाबतीत खुलासा केला असून मी आणि माझे वडील काँग्रेसचेच असल्याचा दावा केला आहे.

ओबीसी आरक्षण विरोधी याचिकाकर्ता म्हणतो 'मी काँग्रेसचाच'...
ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूर

विकास गवळी हे आज उस्मानाबाद येथील बारा बलुतेदार, अलुतेदार,भटके विमुक्त, सकल ओबीसी महासंघाच्या विभागीय चिंतन बैठकीसाठी आले होते. ओबीसींवर सातत्याने गेली तीस वर्षांपासून अन्याय होत दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत ओबीसींवरील हा अन्याय दूर करण्यासाठी जनगणना करणे गरजेचे असून या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com