परभणीत पेट्रोल 115.93 तर डिझेल 104.07 रुपयांवर...

परभणी जिल्ह्यात पेट्रोल 115.93 रुपये प्रती लिटर रुपयावर दर पोहचले आहेत. तर डिझेलने काही दिवसापूर्वी शंभरी पार करून 104.07 रुपये इतके झाले आहे.
परभणीत पेट्रोल 115.93 तर डिझेल 104.07 रुपयांवर...
परभणीत पेट्रोल 115.93 तर डिझेल 104.07 रुपयांवर...Saam Tv News

परभणी: इंधन दरवाढीची घोडदौड चालूच असून सर्वसामान्य जनता पुन्हा भरडली जात आहे. परभणी जिल्ह्यात पेट्रोल 115.93 रुपये प्रती लिटर रुपयावर दर पोहचले आहेत. तर डिझेलने काही दिवसापूर्वी शंभरी पार करून 104.07 रुपये इतके झाले आहे. तब्बल 23 दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर 28 सप्टेंबरपासून डिझेलचे दर 25 ते 30 पैसे तर पेट्रोलच्या दरात दरात 22 ते 24 पैशाने वाढ होत आहे. (In Parbhani, petrol is priced at Rs 115.93 and diesel at Rs 104.07)

हे देखील पहा -

ह्या भाववाढीने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडून जात आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने साहजिकच वाहतुकीचा खर्च वाढतो. डिझेलच्या दरातील वाढीमुळे शेती मशागतीचा खर्चही वाढला आहे. मार्च 2021 पासून सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने प्रवास करावा तरी कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com