वाढत्या इंधनदराने त्रस्त, तरुणाची घोड्यावरुन स्वारी

सध्या पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असल्याने वाहन चालकांना पेट्रोल परवडत नाही.
वाढत्या इंधनदराने त्रस्त, तरुणाची घोड्यावरुन स्वारी
वाढत्या इंधनदराने त्रस्त, तरुणाची घोड्यावरुन स्वारी संजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : सध्या पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असल्याने वाहन चालकांना पेट्रोल परवडत नाही. अशात पेट्रोलच्या किंमतीत रोज होणारी वाढ यामुळे वाहण चालकांना दररोज धक्का बसत आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड याने पेट्रोलच्या किंमतीत होणारी वाढीला कंटाळून दोन महिन्यापूर्वी चक्क दुचाकीला दुर केलं आहे.

हे देखील पहा-

दुचाकीला दूर करून पंधरा हजार पाचशे रूपयाचा घोडा घेतला आणि त्या घोड्याने रोज पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास तो करत आहेत. घोडा घेतल्याने आता पेट्रोलचे भाव कितीही वाढले, तरी मला काही घेणे देणे नसल्याचे दत्ता राठोड याचे म्हणणे आहे. दुचाकीला टायर, ऑईल चेंज आणि त्याला लागणारा पेट्रोल हे सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारा झाला आहे.

वाढत्या इंधनदराने त्रस्त, तरुणाची घोड्यावरुन स्वारी
कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंची सोनं जप्त

त्यात पेट्रोल १०५ रूपये प्रती लिटर झाला आहे. दत्ता ने घोडा घेतल्याने पेट्रोलच्या किंमतीत कितीही वाढ झाली, तरी त्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे पेट्रोलची डोकेदुःखी दुर करायची असेल, तर घोडा घ्या किंवा सायकलने प्रवास करा असे तो रस्त्याने ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना सांगत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com