आठवण बाबासाहेबांची; त्यावेळी टीका टिप्पणी झाली हाेती : रामराजे
रामराजे नाईक निंबाळकर बाबासाहेब पुरंदरे Saam Tv

आठवण बाबासाहेबांची; त्यावेळी टीका टिप्पणी झाली हाेती : रामराजे

बाबासाहेबांचे कार्य अलाैकिक असल्याची भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी व्यक्त केली.

सातारा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे shivshahir Babasaheb Purandare यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह देशातील मान्यवर आपल्या भावना व्यक्त करीत त्यांना अदारांजली वाहत आहेत. विधान परिषदेची सभापती ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर ramraje naik nimbalkar हे बाबासाहेबांच्या आठवणीने गहिवरले. ते म्हणाले आजची घटना ही हदयपिळवटून टाकणारी आहे. त्यांच्या कार्यास आमचे नेहमीच पाठबळ राहिल. satara phaltan news

रामराजे नाईक निंबाळकर बाबासाहेब पुरंदरे
'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले एक समर्पित आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाेवती बाबासाहेबांचे गुंतलेले हाेते. शिवाजी महाराज यांचा इतिहास बाबासाहेबांनी व्यासपीठावर आणला. प्रत्येक प्रयाेग मी पाहिले आहेत. स्वतःला झाेकून घेऊन त्यांनी कार्य केले आहे.

या सर्वच गाेष्टीत त्यांना खूप त्रास झाला असणार आहे याविषयी माझ्या मनात काेणतीच शंका नाही. आमच्याशी त्यांचा १९८०-९० च्या काळात संबंध आला. तेव्हा पासून त्यांच्याशी प्रेमाचे संबंध जाेडले गेले. आम्ही त्यांचा सत्कार केला हाेता. त्यावेळी माझ्यावर टीका टिप्पणी झाली हाेती. त्यावेळी बाबासाहेबांनी माझ्याशी मनमाेकळी चर्चा केली हाेती. दरम्यान आजची घटना ही हदयपिळवटून टाकणारी आहे. त्यांच्या कार्यास आमचे नेहमीच पाठबळ राहिल असे रामराजेंनी नमूद केले.

बाबासाहेबांचे कार्य अलाैकिक : शिवेंद्रसिंहराजे

दरम्यान इतिहासाचे गाढे अभ्यासक आपल्यातून गेले याचे दुख संपुर्ण महाराष्ट्रास झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास बाबासाहेबांनी सर्वांसमाेर मांडला. त्यांचे कार्य अलाैकिक असल्याची भावना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com