फोटो वंचितच्या कार्यकर्त्याचा; धमकी ISIS च्या नावाने, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

Jalna Cyber Crime News : या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेल पोलीस अधिक तपास करतायत.
Photo of VBA activist; Threats in the name of ISIS, see what the case is in jalna
Photo of VBA activist; Threats in the name of ISIS, see what the case is in jalnaलक्ष्मण सोळुंके

जालना: ईसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेत काम करत असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला त्याचाच फोटो वापरुन जालना (Jalna) शहराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. एका व्हॉट्सॲप मेसेजच्या (Whatsapp Messege) माध्यमातून ही धमकी देण्यात आलीय. वंचित बहुजन आघाडीचा (VBA) कार्यकर्ता असलेल्या 29 वर्षीय शेख अतिक शेख आयुब यांच्या फोनवर व्हॉट्सॲप मेसेज करून ही धमकी (Threat) देण्यात आलीय. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर सेल पोलीस अधिक तपास करतायत. पोलीस तपासादरम्यान हा मेसेज आंध्रप्रदेशच्या गुंटूर परिसरातून आल्याचं समोर आलंय. (Photo of VBA activist; Threats in the name of ISIS, see what the case is in jalna)

हे देखील पाहा -

Photo of VBA activist; Threats in the name of ISIS, see what the case is in jalna
३५ लाखांच्या अंमली पदार्थांसह बंटी बबलीला अटक

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता शेख अतिक शेख आयुब हे घरी असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर "मै शेख अतिक शेख अय्युब. मै एक सुसाईड बॉंबर हू. मै इसीस के साथ काम करता हू. 7 मई को मै बॉंब फोडने वाला हू. महाराष्ट्र-जालना पुलिस रोख सकते है तो रोख ले. मैने लोन चुराके पैसा जमा करके बॉंब बनाया है" अशा प्रकारचा व्हॉट्सॲप मेसेज अज्ञात आरोपीने तक्रारदाराला आणि त्याच्या दोन मित्राला पाठवून फिर्यादीची अब्रुनुकसान केली म्हणून या प्रकरणी तक्रारदार शेख अतिक शेख आयुब यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर सेल पोलीस अधिक तपास करतायत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com