भंडारा शहराजवळ टोमॅटोचे पीकअप उलटले

भंडारा शहराजवळ टोमॅटोचे पीकअप उलटले
भंडारा शहराजवळ टोमॅटोचे वाहन उटल्याने रस्त्यावर टोमॅटोचा खच पडला होता.

भंडारा ः टोमॅटो घेऊन आलेला पीक अप झाडाला आदळून उलटला. अपघातानंतर रस्त्यावर टोमॅटोचा मोठा खच पडला होता. भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा विद्युत वितरण कार्यालयाजवळ ही अपघाताची घटना घडली. रस्त्यावर टोमॅटोचा खच पडल्याने वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

नागपूर येथून टोमॅटो भरून पीक अप वाहन भंडारा शहराकडे येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर एमएसईबीचे MSEB कार्यालय आहे. पीक अप वेगात असल्याने चालकाला वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पीकअप रस्त्याकडे असलेल्या झाडाला आदळले. Pickup accident near Bhandara city

भंडारा शहराजवळ टोमॅटोचे वाहन उटल्याने रस्त्यावर टोमॅटोचा खच पडला होता.
BIG NEWS | राज्याचा दहावीचा निकाल 99.95 टक्के

झाडाला धडकून ते वाहन रस्त्यावरच उलटे झाले. यात ठेवलेले सर्व टोमॅटोचे कॅरेट रस्त्यावर पखरले गेले. संपूर्ण रस्ता टोमॅटोने माखला होता. काही काळ ह्या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. या अपघातात मात्र कोणतीही जिवित हानी नसली तरी गाड़ी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत पडलेले पीकअप वाहन बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. टोमॅटोमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.Pickup accident near Bhandara city

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com