
Buldhana News : ऑफ्रिकन स्वाईन फ्लूने बुलढाण्यात हजारो डुकरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी बुलढाणा शहरातील डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (bhagyashree vispute) यांनी प्रशासनास दिले आहेत. (Maharashtra News)
बुलढाणा शहरात गेल्या महिन्याभरापासून हजारो डुकरांचा अचानक मृत्यू होत आहे. याबाबतीत संशय आल्याने नगरपालिकेच्या वतीने मेलेल्या डुकरांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर या सर्व डुकरांचा मृत्यू ऑफ्रिकन स्वाईन फ्लू या रोगामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत. त्यानूसार नगरपालिकेने आता या सर्व डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा लोकांचे पथक तयार केले आहे.
नागरिकांनी घाबरु नये
शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफ्रिकन स्वाईन फ्लू पासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नसून नागरिकांनी (citizens) घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन देखील नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे (ganesh pande) यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.