वारकरी संप्रदायात खळबळ! पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, देहू संस्थानच्या विश्वस्तांसह २९ जणांना अटक

पुण्यात एक खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे.
Gambling
Gamblingsaam tv

पुणे : येथे एक खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या चाकण एमआयडीसी हद्दीत (Gambling Crime) जुगार खेळताना देहू संस्थानचे आजी- माजी विश्वस्तांसह नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. देहु संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नगरसेवक मयूर टिळेकर, विशाल परदेशी यांच्यासह तब्बल २६ जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

Gambling
Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना जामीन नाहीच; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल मोरे यांनी याप्रकरणाबाबत खुलासा केला आणि ते निर्दोष आढळल्यास देहू संस्थानच्या नियमानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, असं संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यावर या जुगाराचा पर्दाफाश झाला आणि राजकिय वर्तुळासह वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली.म्हणूनच संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त विशाल मोरे यांच्याबद्दल कठोर पाऊल उचलताना दिसत आहेत, अशी माहिती मंचकचे अप्पर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com