RTE Admission: खासगी शाळांकडून जबरदस्‍ती शुल्‍क वसुली; पालकांकडून तक्रार

खासगी शाळांकडून जबरदस्‍ती शुल्‍क वसुली; पालकांकडून तक्रार
RTE Admission
RTE AdmissionSaam tv

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील काही खासगी शाळा या पालकांकडून ‘आरटीई’चे (RTE) शैक्षणिक शुल्क बळजबरीने वसूल करत असल्याचा धक्कादायक आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. काही पालकांनी (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभागाकडे तशा आशयाच्या लेखी तक्रार देखील दाखल केल्या आहेत. (Breaking Marathi News)

RTE Admission
Jalgaon News: मुलगा आला नाही म्‍हणून आई गेली घरी; दार उघडताच बसला धक्‍का

दारिद्र्य रेषेखालील मुलांना देखील चांगले शिक्षण (Education) मिळावे याकरीता खासगी इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळांमध्‍ये २५ टक्‍के आरक्षण असते. अशा मुलांना आरटीईच्‍या माध्‍यमातून मोफत प्रवेश दिला जात असतो. परंतु, शासनाकडून आरटीईचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने काही खाजगी शाळा चक्क पालकांकडूनच आरटीईची शैक्षणिक शुल्क बळजबरीपूर्वक वसूल करत आहेत. शासनाकडून आम्हाला आरटीईचे अनुदान मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमची फीस परत करू; असं या शाळा पालकांना सांगत आहेत.

RTE Admission
Nanded News: लग्नात डिजे वाजवण्यावरून दोन गट भिडले

अनुदान मिळूनही शुल्‍क परत नाही

शासनाकडून आरटीई अनुदान मिळून देखील बऱ्याच खाजगी शाळांनी पालकांना त्यांची शैक्षणिक शुल्क परत केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शैक्षणिक विभागाने पालकाच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, सर्व शाळांना पालकांना वसूल केलेली फिस परत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. खाजगी शाळांना पालकांना फीस परत दिली नाही. तर शाळेवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी संजय नाईकवडे यांनी सांगितल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com