बंद पडलेला टोलनाका बनला पिस्तूल विक्री केंद्र

पिस्तूल विक्री करणारी टोळी
पिस्तूल विक्री करणारी टोळी

नगर ः नगर जिल्ह्यात एका बंद टोलनाक्यावर भलतेच काम सुरू होते. पोलिसांनी छापा टाकून गैरकृत्याचा पर्दाफाश केला आहे. हा टोल नाका गुन्हेगारांचा अड्डा बनला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अवैध पिस्तूल विक्री-खरेदी रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी मोहीम उघडली आहे. नगर-जामखेड रस्त्यावर घातलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या अटकेमुळे जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या पिस्तूल विक्रीच्या धंद्याचा पर्दाफाश होईल.

नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारात एक टोलनाका बंद पडला आहे. त्या टोल नाक्याजवळ गावठी कट्टे विक्रीसाठी 2 व्यक्ती घेऊन घेणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संदीप गायकवाड (वाघोली, पुणे) आणि भारत हतागळे (गोविंदवाडी,ता. गेवराई, जिल्हा बीड) या 2 जणांना ताब्यात घेण्यात आले.(Pistol sales at closed toll plazas)

पिस्तूल विक्री करणारी टोळी
एकादशीला मटण न केल्याने माळकरी आईचा खून,मुलाचा कोठडीत मृत्यू

त्यांच्याकडून 2 गावठी बनावटीचे कट्टे, 2 जिवंत काडतुस, मोबाईल असा 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखाली काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.

जिल्ह्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होते. या तस्करांकडे पिस्तूल असतात. महसूल यंत्रणा किंवा शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी या पिस्तुलांचा ते वापर करतात. काही ठिकाणी गोळीबार झाल्याच्याही घटना आहेत. जिल्हा पोलिसांनी या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे ठरविले आहे. त्यातून कारवाई केली जात आहे. (Pistol sales at closed toll plazas)

Edited By - Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com