लातूरचा रिंगरोड रस्ता खड्डेमय; नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन

लातूर शहराची प्रगती दिवसेंदिवस होत असताना अंबेजोगाई नाका ते नांदेड नाका यातील रिंगरोड आता खड्डेमय झाला आहे. वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन केले आहे.
लातूरचा रिंगरोड रस्ता खड्डेमय; नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन
लातूरचा रिंगरोड रस्ता खड्डेमय; नागरिकांचे अर्धनग्न आंदोलनSaam Tv News

लातूर - शहराची प्रगती दिवसेंदिवस होत असताना अंबेजोगाई नाका ambejogai naka ते नांदेड नाका nanded naka यातील रिंगरोड ringroad आता खड्डेमय pits on road in latur झाला आहे. वाहनचालक आणि नागरिकांना citizens मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी खड्ड्यात अर्धनग्न आंदोलन half naked protest केले आहे. रस्त्यांची दुरुस्ती तातडीने न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हे देखील पहा -

लातूर शहराला चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्ग जोडले आहेत, पण अंबेजोगाई नाका ते नांदेड नाका दरम्यान असलेला रिंगरोड पूर्णत: खड्डेमय झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी 3 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, पण ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. याच रस्त्यावरून डी मार्ट, सिध्देश्वर देवस्थान व अन्य गावखेड्यात जाणारा मार्ग असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

लातूरचा रिंगरोड रस्ता खड्डेमय; नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन
५ कोरोना रुग्ण आढळल्याने सुनील शेट्टीची इमारत सील

अंबेजोगाई आणि पुण्याहून pune येणारी वाहने याच रिंगरोड वरून जात असल्याने वाहतुकीची कोंडी अनेकदा होत असते. यावर लातूर येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला विनंत्या केल्या पण, हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आज उमेश कांबळे यांच्यासह श्रीकांत राजणकर, श्रीकृष्ण पाडे, बालाजी जाधव, अनिल जाधव यांनी अर्धनग्न आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com