लग्नात लेकीला वृक्षरोपांचे कन्यादान
लग्नात वधू-वरांना दिली वृक्षरोपे.

लग्नात लेकीला वृक्षरोपांचे कन्यादान

अहमदनगर : कोरोना काळापासून सर्वच वृक्षसंवर्धनाबाबत अलर्ट झाले आहेत. प्रत्येकाला अॉक्सीजनचे महत्त्व पटल्याने वृक्षारोपण केले जात आहे. सोनई परिसरात असाच एक विवाह झाला. त्यात वृक्षरोपांची भेट देवून कन्यादान करण्यात आले. वधू-वरांच्या हस्ते त्या रोपांची लागवडही करण्यात आली. स्नेह फाऊंडेशनने 'वृक्ष कन्यादान' हा उपक्रम केला आहे.

शनैश्वर विद्यालयात सन १९८८-८९ मध्ये दहावीत असलेल्या चाळीस जणांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे. त्यांनी एकत्र येत नुकताच मेळावा घेतला. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.मुलांसोबत मुलींचाही मोठा सहभाग होता. त्याच कार्यक्रमात या वृक्ष कन्यादान योजनेची बीजे पेरली होती.Plant gift to the bride at the wedding

या ग्रुपमध्ये शेतकरी, गृहिणी, व्यावसायिक व काही उद्योजकही आहेत. या मित्रांनी योगा, कोरोना योद्धा पुरस्कार, पूरग्रस्तांना मदत, गरजूंना किराणा साहित्य व भोजन दिले. भविष्यात मोठे कार्य करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संघाने स्नेह फाउंडेशन नावाने संघटना स्थापन केली आहे.

विवाह समारंभात जाऊन वधू-वरांना वृक्ष रोपांचे वाटप केले जात आहे. नितीन दरंदले, संतोष क्षीरसागर, मनिषा जवादे, संगीता जोरवर-पिसाळ, डॉ. संजय तुवर, राजेंद्र सानप, संजय गर्जेसह इतरांनी सुरू केलेल्या विधायक कामांचे कौतुक होत आहे.

माजी विद्यार्थी संघाच्या निमित्ताने आम्ही सर्व जुने सवंगडी एकत्र आल्याचा आनंद खुप मोठा आहे. आपणही समाजाचे देणं लागतो ही भुमिका घेत कार्य सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया नितीन दरंदले यांनी सांगितली.Plant gift to the bride at the wedding

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com