पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगासह इतर संस्थाही काबीज केल्या; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

"हे डबल इंजिनचे सरकार; याचा फटका राज्याला बसत आहे"
Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan NewsSaam Tv

Satara News : केंद्रीय निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी निवडणूक आयोगासह इतर संस्थाही काबीज केल्या आहेत असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला. साताऱ्यात काँग्रेस (Congress) कमिटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, लोकशाहीच्या संस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट ही आहे त्याच्यावरही नियंत्रण असल्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आता त्यांनी काम करावे मात्र असं होताना दिसत नाही महाराष्ट्रावर अन्याय होणारे निर्णय घेतले जात आहेत.

Prithviraj Chavan News
Jalgaon: दिवाळीच्‍या दिवशीच कुटुंबावर दुःखाचा अंधार; महावितरणच्या तंत्रज्ञासह एकाचा शॉक लागून मृत्यू

हे डबल इंजिनचे सरकार आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या हिताचे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय घेतले त्याला फडणवीसांची मुखसंमती असल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

२२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आता मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून आता काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरू आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा करेल. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे बाहेर गेलेत, त्यांना परत कसे आणता येईल असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com