पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी : देवेंद्र फडणवीस

देहू गाव येथील संत तुकाराम महाराज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

देहू: तुकाराम महाराजांनी जो मार्ग दाखवला, त्याच मार्गावर चालण्याचे काम आपले पंतप्रधान करत आहेत. रंजल्या गांजल्यांसाठी काम करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. या सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या सोहळ्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे. या सोहळ्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मनोगत व्यक्त केले.

Devendra Fadnavis
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचे नाव नरेंद्र मोदीही मान्य करतील - संजय राऊत

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी भाग्यशाली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या कार्यक्रमास येता आले. मोठ्या प्रमाणात कर्मकांडात यामध्ये समाज लीन होत होता. यावेळी भागवत धर्माची पताका घेऊन तुकाराम महाराजांनी अंधश्रध्देपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न केले. तुकोबा महाराजांच्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांनीही समाजाच्या सेवेसाठी त्या मार्गाने जात आहेत.

वारकऱ्यांमध्ये कोणीही मोठं नसते, कोणी छोट नसते, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हेच तर वारकरी संप्रदाय सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबा रायांच्याच मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत आहेत, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Devendra Fadnavis
तुकाराम महाराज उर्जास्त्रोत, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली - PM मोदी

तुकाराम महाराज उर्जास्त्रोत

पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले, 'सर्व संताच्या चरणावर मी कोटी कोटी वंदन करतो. मनुष्य जन्म मिळंण हे दुर्लभ आहे तसंच मनुष्याचा जन्म भेटल्यानंतर संताचा सहवास देखील दुर्लभ असतो. मात्र, मला या संतमेळ्याव्यामध्ये यायला मिळालं, देहुला यायला मिळालं हे मी माझं सौभाग्य समजतो.

देहु ही संतशिरोमणी तुकाराम महाराजांची (Tukaram Maharaj) जन्मभूमी, कर्मभुमी आहे. काही महिन्यांपुर्वी मी पालखी मार्गासाठी बनविण्यात येत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भुमिपुजन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचं सौभाग्य मिळालं. या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम टप्प्या टप्प्याने पुर्ण होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com