धक्कादायक : लग्नातील अन्नातून 300 वऱ्हाडींना विषबाधा
Food poisoningSaamTV

धक्कादायक : लग्नातील अन्नातून 300 वऱ्हाडींना विषबाधा

लग्न समारंभ (Wedding ceremony) व्यवस्थित पारपडल्यानंतर वऱ्हाडींनी जेवनं केलं आणि जेवनानंतर काही वेळाने अनेकांना मळमळ उलट्या होऊ लागल्या.

नांदेड : नांदेडमधील एका लग्न सोहळ्यात 300 वऱ्हाडींना जेवनातून विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरची घटना कंधार तालुक्यातील दिग्रस येथे काल घडली आहे. लग्न समारंभ (Wedding ceremony) व्यवस्थित पारपडल्यानंतर वऱ्हाडींनी जेवनं केलं आणि जेवनानंतर काही वेळाने अनेकांना मळमळ उलट्या होऊ लागल्याने रुग्णांना कंधारच्या उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे देखील पहा -

अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याचे लक्षात येताच रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. नेमकं कोणत्या पदार्थामुळे ही विषबाधा झाली हे मात्र समजू शकले नाही. सध्या सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com