नवापूर शहराजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

जुगाराचे साहित्य-साधने असा १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत क्लब मालकासह १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नवापूर शहराजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
नवापूर शहराजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्तदिनू गावित

नंदुरबार: नवापूर शहराजवळील मानस हॉटेल जवळच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत जुगाराचे साहित्य-साधने असा १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत क्लब मालकासह १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Police action on a gambling den near Navapur city; 1 lakh 86 thousand items confiscated)

हे देखील पहा -

नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नवापूर शहराजवळ स्थित मानस हॉटेल शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी रात्री एक वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईमध्ये क्लब मालकासह गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील एकूण १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य साधने व रोखड असा १ लाख ८६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कलम कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नवापूर पोलीस अधिक तपास करीत आहे.

नवापूर शहराजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने केली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेला लागून असलेल्या नवापुर शहराजवळ जुगार अड्ड्यांसह दारु तस्करी व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पोलिसांसमोर कारवाईचे मोठे आव्हान आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.