भोंग्याच्या मुद्द्यावर मनसे ठाम; पोलीस अ‍ॅक्टीव मोडमध्ये, राज्यभरातील मनसैनिकांची धरपकड सुरुच

४ मे पासून मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज यांनी केल्यामुळे पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे.
MNS Vs Police News, Loudspeaker controversy news in Marathi, Loudspeaker issue news updates
MNS Vs Police News, Loudspeaker controversy news in Marathi, Loudspeaker issue news updatesSaam TV

उल्हासनगर : भोंग्यांच्या निर्णयाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला ४ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. तसंच मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन देखील राज यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्यातील पोलिस प्रशासन अलर्ट झालं असून काल रात्रीपासूनच पोलिसांनी उल्हासनगरमधील (Ulhasnagar) मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. (Loudspeaker controversy news in Marathi)

या कारवाईत पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, उल्हासनगर शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं तर उल्हासनगर येथील राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक शहर संघटक मैनुद्दीन शेख आणि विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पाचही जणांना कलम १५१ (३) खाली ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

MNS Vs Police News, Loudspeaker controversy news in Marathi, Loudspeaker issue news updates
मनसे आक्रमक; अजान सुरू असताना भोंग्यांवरुन हनुमान चालीसाचं पठण

दरम्यान, कल्याण डोंबिवलीत (Dombivali) देखील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु असून आत्तापर्यंत पोलिसांनी २० ते २५ कार्यकर्त्तांना ताब्यात घेतल आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत सरकारला ४ तारखेचा अल्टिमेटम दिला होता . काल देखील राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्या समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं .या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली मध्ये ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिस यंत्रणेकडून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या .यामध्ये मनसे आमदारांना देखील नोटीस पाठविण्यात आली होती. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

तर नाशिकमध्ये (Nashik) देखील पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. जुन्या नाशकात मनसेने भोंगे वाजवले असून आज पहाटे अजानच्या वेळी जबरेश्वर मंदिराबाहेर भोंग्यावरुन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यात आली होती. शिवाय याबाबतचा एक व्हिडीओ देखील मनसे कार्यकर्त्यांनी केला व्हायरल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com