Barsu Refinery साठीचा आजचा महत्वपूर्ण दिवस; राजन साळवींची सुरक्षा वाढवली (पाहा व्हिडीओ)

Barsu Refinery Protest News: ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुंबईतील अख्खी शिवसेना रत्नागिरीत आणू असा इशारा दिला.
MLA Rajan Salvi , Barsu Refinery Project, Ratnagiri News
MLA Rajan Salvi , Barsu Refinery Project, Ratnagiri Newssaam tv

Barsu Refienry Project Latest Updates : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (barsu refinery project) राजकीय क्षेत्रात देखील माेठा गदाराेळ निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे (uddhav hackeray faction) आमदार राजन साळवी (mla rajan salvi) यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज रिफानयरीच्या काही प्रमुख मुद्द्यांवर प्रशासन आंदाेलकांसह तज्ञांची राजापूरात (rajapur) आणखी एक बैठक घेणार आहे. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय हाेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Breaking Marathi News)

MLA Rajan Salvi , Barsu Refinery Project, Ratnagiri News
Shirdi News : १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; वाचा ग्रामस्थांच्या मागण्या

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) माती परीक्षणाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच ग्रामस्थांनी माेठं आंदोलन छेडलं.

गेल्या दाेन दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही बारसूतील सर्वेक्षण त्वरित थांबवण्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी मात्र बारसू रिफायनरी प्रकल्पाला ट्विट करुन त्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

MLA Rajan Salvi , Barsu Refinery Project, Ratnagiri News
Rajaram Sahakari Sugar Factory Election Results : करशील काय नाद... हाेशिल बाद ! महादेवराव महाडिक यांचा विजय असाे, काेल्हापूरात जल्लोष सुरु

राजन साळवी यांनी ट्विटमध्ये कोकणातील बेरोजगारीच्या मुद्यावर प्रकल्पाला समर्थनच…. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करून नये, अशी मागणी साळवी यांनी केली.

राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवल्याने या प्रकल्पावरून ठाकरे गटात (पक्षात) एकमत नसल्याचं समोर येत आहे. त्यातूनच ग्रामस्थांचा राेष वाढू शकताे ही शक्यता गृहित धरुन आमदार राजन साळवी यांची आज (गुरुवार) सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राजन साळवी यांना दिल स्थानिक पोलिसांचे एस्कॉर्ट. पोलीस अधीक्षकांनी पुरवली अतिरिक्त सुरक्षा.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com