New Year 2023 : मद्य प्रेमींनो राहा सावधान; पोलिसांसह, राज्य उत्पादन शुल्क विभागाची असणार नजर, घ्या 'ही' काळजी

पार्टीसाठी बुलढाण्यातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजन केले आहे.
New Year 2023
New Year 2023 Saam Tv

संजय जाधव

Thirty First Party News : राज्यातील अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टसाठी पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमुळे होणाऱ्या दारूविक्रीतून सरकारला भरभक्कम महसूल मिळतो. या पार्टीसाठी बुलढाण्यातही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थर्टी फर्स्ट पार्टीचे आयोजन केले आहे. (Latest Marathi News)

New Year 2023
Aurangabad : वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागितले; शिंदे गटातील आमदाराच्या मुलाकडून थेट हातपाय तोडण्याची धमकी!

थर्टी फर्स्ट पार्टीमुळे होणाऱ्या दारूविक्रीतून सरकारला भरभक्कम महसूल मिळतो. दरम्यान थर्टी फर्स्ट पार्टीत या एक दिवसाकरिता मद्यपानासाठी परमिटरूम आणि देशी दारू विक्रेत्यांनी चक्क २९ हजार ८०० परवाने खरेदी केले आहेत. थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथक करडी नजर ठेऊन असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेताच होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री हे नवीन वर्षाच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले. वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने ही मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही या परवानाधारक मध्ये विक्रीच्या ठिकाणी सतत तपासणी केली जाणार आहे.

New Year 2023
Maharashtra Politics : अजित पवारांच्या 'त्या' विधानामुळे महाराष्ट्रात उद्रेक होईल; शिंदे गटातील नेत्याचा इशारा

मद्य पिण्याचा परवाना नसेल तर ग्राहकासह हॉटेल मालकालाही दंड केला जाईल. एका व्यक्तीला देशी दारू पिण्यासाठी ५ रुपयांमध्ये एक दिवसीय परवाना दिला जातो. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात मद्यविक्री एकदिवसीय परवाने २९ हजार ८०० परमिट रूम आणि देशी रूम दारू विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com