नांदेड मध्ये अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नांदेड शहरातील चोरट्यांनी महिलेचे मंगळसुत्र पळवल्या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सव्वा लाखाचे दागिने जप्त केले आहेत.
नांदेड मध्ये अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नांदेड मध्ये अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्याSaam Tv

नांदेड - शहरातील दोन चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसुत्र पळवल्या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना criminals बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून जवळपास सव्वा लाखाचे दागिने जप्त केले आहेत.Police arrest hardened criminals in Nanded

दिनांक 26 जुन रोजी सुरेखा इंगोले या पती सोबत दुचाकी Two wheeler वरुन खडकपुरा भागातून जात असताना त्यांच्या पाठलाग करत दुचाकीवरून आलेल्या हरिश देविदास शर्मा आणि आरेफ शेख जाफर यांनी या पतीपत्नींचा पाठलाग करत सुरेखा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र Mangalsutra हिसकावून पळ काढला होता.

या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी Police तपास चक्रे जलद गतीने फिरवून दोन्ही चोरट्यांना अखेर अटक Arrest केली हरिश शर्मा आणि आरेफ शेख जाकेर याने सुरेखा इंगोले यांचे मंगळसूत्र पळविल्याची कबुली दिलीच मात्र इतर दोन गुन्ह्याचीही कबुली या होन्ही चोरट्यांनी दिली आहे.

दरम्यान या चोरट्यांकडून जवळपास सव्वा लाखाचे दागिने ही पोलिसांनी जप्त केले आहेत.

तसेच या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com