रिक्षा प्रवासात दागिने चाेरणाऱ्या २ महिलांना पोलिसांनी घेतंल ताब्यात

नाशिकमध्ये काही दिवसांपासून रिक्षा, बसने प्रवास करत असताना चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
रिक्षा प्रवासात दागिने चाेरणाऱ्या २ महिलांना पोलिसांनी घेतंल ताब्यात
Nashik CrimeSaam TV

तबरेज शेख -

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काही दिवसांपासून रिक्षा, बसने प्रवास करत असताना चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या चोराट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अशातच मुंबई नाका परिसरात पोलिस पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयीत महिला बस स्टँडवर उभ्या असलेल्या दिसून आल्या त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. दरम्यान पोलिसांनी लक्ष्मी व्यंकटेश गाजवा (३५, रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे)  तिच्यासोबत ४ वर्षे वयाचा मुलगा आणि भाग्या राजू गाजवा या दोन महिलांना ताब्यात घेतलं.

मुंबई नाका पोलीसांच्या हद्दीत रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागदागिने व रोकड चोरुन नेल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. या घटनांबाबत प्राजक्ता वैभव सोनजे (रा. आर्यवर्त, महाराणा प्रताप चौक, सिडको) यांनी तक्रार दिली होती. त्या ४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी संभाजी चौक ते दत्त मंदिर स्टॉप दरम्यान रिक्षाने प्रवास करित असतांना २४ हजार ९६५ रूपयांचा मुद्देमाल दोन संशयित महिलांनी चोरुन नेला होता. तसेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारती गांगुर्डे (रा. बनकर चौक, काठे गल्ली, व्दारका) या कराड फरसाण, व्दारका येथून खडकाळी सिग्नलपर्यंत प्रवास करत असताना त्यांच्या पर्समधून ५० हजार रुपयांची चोरी (Theft) झाली होती.

हे देखील पाहा -

दरम्यान, या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या निर्देशाने पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे, सहायक निरिक्षक के. टी. रौंदळे, हवालदार सोनार, टेमगर, पोलिस शिपाई आव्हाड, पानवळ, शेख, गुंजाळ, उगले, साळुंखे, महिला हवालदार हिरवे यांनी दोन्ही महिला व त्यांच्या लहान मुलाचा शोध घेतला. अशातच ७ मे २०२२ रोजी महामार्ग बस स्टँन्डवर दोन संशयित महिला व त्यांच्यासोबत एक लहान मुलगा रिक्षा स्टॉप जवळ फिरतांना सापडले. त्यांना पोलिसांनी 'तुम्ही का फिरत आहात' असं विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याचवेळी गुन्ह्यातील तक्रारदार महिला प्राजक्ता सोनजे व भारती गांगुर्डे यांना पोलीस ठाण्यात बोलावून पकडलेल्या दोन्ही महिला व त्यांचा लहान मुलगा दाखविला. तेव्हा दोन्ही महिलांनी संशयित महिलांना व मुलाला ओळखले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.