'अग्निपथ' ला विराेध करण्यास जमलेल्या युवकांना पाेलीसांनी घेतलं ताब्यात

आज (रविवार) सकाळच्या प्रहरी वेगवेगळ्या ठिकाणी युवक जमले हाेते.
youth, solapur, agnipath scheme,central government
youth, solapur, agnipath scheme,central governmentsaam tv

सोलापूर : 'अग्निपथ' याेजनेचा (agnipath scheme) निर्णय न पटल्याने त्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या तब्बल ९२ युवकांना पाेलीसांनी ताब्यात घेत त्यांना नाेटीस देऊन साेडण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी ही कारवाई केल्याची माहिती साेलापूर पाेलीसांनी दिली. (solapur latest marathi news)

केंद्र सरकारने (central government) भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. याला विरोध करण्यासाठी सोलापुरातील (solapur) काही तरुण (youth) आंदोलनासाठी रेल्वे स्टेशन परिसरात जमत असताना पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले.

youth, solapur, agnipath scheme,central government
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

'अग्निपथ' योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला अनेक राज्यात हिंसक वळण लागले आहे. यामुळे राज्यातील पोलीसही सध्या सतर्क आहेत. त्यातच सोलापुरातही काही विद्यार्थी आंदोलनासाठी एकत्र येत असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार पोलीसांनी रेल्वेस्थानक, सात रस्ता परिसरात कडक बंदोबस्त लावला आणि ९२ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या तरुणांना नोटीसा देऊन सोडून ही देण्यात आलं.

Edited By : Siddharth Latkar

youth, solapur, agnipath scheme,central government
Ashadhi Wari: विठ्ठलभक्तांनाे! लाडू प्रसाद महागला; जाणून घ्या नवा दर
youth, solapur, agnipath scheme,central government
नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, फिनलँडमध्ये मिळवलं सुवर्णपदक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com