सांगलीत आमिर खानला अटक; रेमडेसिव्हरचा काळाबाजार भाेवला

सांगलीत आमिर खानला अटक; रेमडेसिव्हरचा काळाबाजार भाेवला
remdesivir injection

सांगली : मिरज येथील अ‍ॅपेक्स रुग्णालयातुन रेमडेसिव्हर इंजेक्शनची remdesivir injection काळया बाजारात विक्री झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अ‍ॅपेक्स मध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रुग्णालयीन कर्मचारी आमिर खान या युवकास पाेलिसांनी अटक केली आहे. (police-arrested-apex-hospital-employee-amir-khan-remdesivir-injection)

या प्रकरणी आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक झाली आहे. एका डॉक्टरसह दोन रुग्णालयीन कर्मचारी अद्याप फरारी आहेत.

मिरजेतील अपेक्स रुग्णालयातील अपप्रृवत्ती प्रकरणी पाेलिसांनी त्यांचा तपास अधिक गतीमान केला आहे. अपेक्स हॉस्पिटल येथील रुग्णांच्या बिलाबाबत तफावत आणि रुग्णांच्या उपचार करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल डॉ. महेश जाधव, डॉ. मदन जाधव, रुग्णवाहिका चालक अशा तेराहून अधिक लोकांवर फसवणुकीचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल आहे.

अपेक्स प्रकरणात नवनवीन माहिती समाेर येऊ लागली आहे. रुग्णवाहिका चालकांनी कमिशन घेऊन रुग्णांना उपचारासाठी अपेक्समध्ये घेऊन येत असे नुकतेच उघड झाले हाेते. हे प्रकरण ताजे असतानाच अपेक्स मधील आमिर खान हा डॉ. महेश जाधव यांच्याशी जवळीक असणाऱ्या कर्मचा-यांना विश्वासात घ्यायचा. रुग्णाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायचे आहे असे भासवत असे.

ते इंजेक्शन नंतर काळ्या बाजाराने विक्री करीत असे. याबाबतचमी माहिती पाेलिस तपासात समोर आली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी आमिर खानला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

remdesivir injection
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

तपसातील प्रत्येक अपडेट स्वतः अधीक्षक गेडाम घेताहेत

कोरोना काळात डॉक्टरांकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. या काळात उपचारात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तपसातील प्रत्येक अपडेट स्वतः अधीक्षक गेडाम घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com