सौरऊर्जा प्रकल्पातील कॉपर वायरची चोरी;  8 जणांच्या टोळीला अटक
Hingoli CrimeSaam Tv

सौरऊर्जा प्रकल्पातील कॉपर वायरची चोरी; 8 जणांच्या टोळीला अटक

Hingoli Crime : सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये या चोरट्यांनी 20 मार्चला चोरी केली होती

हिंगोली : सध्या राज्यभर सौरऊर्जेवर चालणाऱ्या विजेचे मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून केंद्र आणि राज्य सरकार सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती सुरू करण्यासाठी प्राधान्य देत आहे. मात्र, याच सौर ऊर्जा प्रकल्पाला गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे ग्रहण लागले होते. चोरटे सौर ऊर्जा प्रकल्पामधील मौल्यवान किमतीचा कॉपर केबल व विद्युत ट्रान्सफार्मर मधील ऑईल चोरून नेत असल्याने या कामामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता हिंगोली पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली आहे.

Hingoli Crime
धक्कादायक! हॉलमध्ये ४ वर्षीय चिमुकली झोपली होती; इतक्यात 'तो' घरात शिरला अन्...

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये या चोरट्यांनी 20 मार्चला चोरी केली होती. या प्रकल्पाचे लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने हातात घेत आज विविध जिल्ह्यातील आठ चोरट्यांना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरट्याकडून मुद्देमाल विकून मिळवलेल्या 5 लाख 80 हजार रुपयांच्या रकमेसह , गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली आणि पिकप वाहन मिळून 7 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या तपासात या चोरट्यांनी बुलढाणा हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळे अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com