Satara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक

पाेलिसांनी या घटनेचे गांभीर्य पाहून तातडीने संशयितांना ताब्यात घेतले.
Satara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक
arrestsaam tv

सातारा : महिला वनरक्षक सिंधू सानप आणि पती सूर्याजी ठोंबरे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी पाेलिसांनी पळसवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा यांना अटक केली आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त पाेलिस अधीक्षक अजित बाे-हाडे यांनी दिली. (satara police arrests former sarpanch of palasvade village for beating forest range officer)

दरम्यान महिला (women) वन (forest) रक्षक सानप या गर्भवती असल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेचे पडसाद समाज माध्यमात देखील उमटले. साता-यात (satara) अनेकांनी या प्रकाराचा निषेध नाेंदविला आहे.

मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली हाेती. त्यानूसार पाेलिसांनी जानकर आणि त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले आहे. जानकर याला शिरवळ येथून तर पत्नी प्रतिभाला सातारा शहरातील शाहूनगरमधून ताब्यात घेतल्याची माहिती अजित बाे-हाडे यांनी दिली.

edited by : siddharth latkar

arrest
Gadchiroli: कुरेखेडात भाजप, मूलचेरात एनसीपी- सेना, धानाेरात काॅंग्रेसचा फडकला झेंडा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.