
हिंगोली: हिंगोलीतील मुख्य बाजारपेठेत ढोल-ताशांच्या गजरात मनसेकडून (MNS) महाआरतीची सुरुवात करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या महाआरती नंतर आरतीला येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कळमनूरी पोलिसांनी (Police) घेतले ताब्यात आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद बांगर यांच्यासह दोघांना घेतले ताब्यात घेतले आहे. कळमनुरी हद्दीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
हिंगोलीमधील मुख्य बाजारपेठेत मनसेच्या (MNS) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात महाआरतीला सुरुवात केली आहे. या महाआरतीला मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत हिंदुत्ववादी संघटना असलेल्या बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. हिंगोली शहरातील धडवाई हनुमान मंदिरात हा महाआरती चा कार्यक्रम पार पडला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंगोली पोलिसांच्या वतीने या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन हनुमान चालीसा देखील पठण केली आहे.
मनसेने (MNS) आजपासून राज्यभरात भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. राज्यभरात पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.