बैलाच्या हत्येप्रकरणी वाई तालुक्यातील युवक ताब्यात; चाैकशी सुरु

बैलाच्या हत्येप्रकरणी वाई तालुक्यातील युवक ताब्यात; चाैकशी सुरु
police arrested accused from wai

सातारा : जावळी तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाला निर्दयीपणे मारून टाकले होते. या घटनेचे वृत्त साम टिव्हीने सर्वात आधी दाखवल्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. या मुक्या जनावराला अतिशय क्रूरपणे मारल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. पोलिसांना सुद्धा आरोपी शोधण्याचे एक प्रकारे आव्हानच होते. अखेर मेढा पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीस शनिवारी (ता.10) जेरबंद केले आहे. कुमार प्रकाश पडवळ (वय 28) असे संशयिताचे नाव आहे. कुमार हा वाई wai तालुक्यातील कुंभारवाडी या गावचा रहिवाशी आहे. कुमारने सुमारे सहा दिवसांपूर्वीच या बैलास भोर तालुक्यातील पुणे बैल बाजारातून आपल्या स्वतःच्या वाहनातून सरताळे येथे आणून झाडाला बांधले. त्याची हत्या केली असल्याची कबुली मेढा पोलिसांना तपासात दिली आहे. (police-arrested-youth-from-wai-taluka-beating-bail-satara-crime-news)

या प्रकाराचा तपास लवकर व्हावा अशी मागणी प्राणी मित्रांकडूनही झाली हाेती. मेढा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी तपासाची सूत्रे गतिमान करत हत्या झाल्यापासून सहा दिवसांच्या आतच बैलास मारणा-या संशयित आराेपीस जेरबंद केेले.

याबाबत पाेलिस निरीक्षक अमाेल माने म्हणाले बैलाची हत्या करणारा संशयित आरोपीने या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले वाहन एम. एच. 11 टी 2019 हे ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्या कारणासाठी बैलाची हत्या झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास सुरु आहे. दरम्यान मेढा पाेलिसांच्या कामगिरीमुळे प्राणीप्रेमींतून समाधान व्यक्त हाेत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com