
मुंबई : शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सदस्य आणि राणे समर्थक सोहम काटे यांनी जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आज शिवसेना-ठाकरे गटाच्या मोर्चा काढल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली होती. (Police case filed against shivsena mla bhaskar jadhav)
शिवसेना आणि ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चानंतर माध्यमाशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानहानी, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान, चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या दडपशाही विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.