हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी साउंड सिस्टम केली जप्त

'राज ठारकरेंना हिंदुत्ववादी भूमिका घेण्याचा काहीही अधिकार उरलेला नाही.'
हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी साउंड सिस्टम केली जप्त
Hanuman Templeसंजय जाधव

बुलढाणा : खामगाव शहरातील चांदमारी भागातील हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावुन हनुमान चालीसा दररोज सकाळी सहा नंतर आरतीच्या वेळेस वाजवण्यात येते. परंतु आज शहर पोलीसांनी सकाळी पाचच्या सुमारास चांदमारी येथील मंदिरात जाऊन साउंड सिस्टम मशीन ताब्यात घेतली आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी लाऊडस्पीकर जप्त करण्यात आला त्यावेळी तो पुर्णपणे बंद होते.

दरम्यान, शहरातील अनेक मशिंदींमध्ये सकाळी सहा वाजण्याच्या आधीच भोंग्यावरुन अजान दिली होती. याबाबत मनसे आनंद गायगोळ यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांनी मंदिरामध्ये जाऊन गैर कायदेशीररित्या मशीन उचलून नेली असल्याची माहिती दिली. तसंच पोलिसांच्या (Police) या कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगितलं. तसंच शहरातील अनेक मशिदींमध्ये ज्या वेळेस कायद्यांचे उल्लंघन करत सकाळी सहा वाजायच्या आधीच अजान देण्यात आली .यातील पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली.

हे देखील पाहा -

तर स्थानिक शिवसेना नेत्यांचा या आंदोलनाला विरोध बघायला मिळाला, स्थानिक शिवसेना नेते म्हणतात की राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बद्दलविले, अनेक भूमिका बदलविल्या त्यामुळे त्यांना अशी हिंदुत्ववादी भूमिका घेण्याचा काहीही अधिकार उरलेला नाही नसल्याचं शिवसेना नेते दत्ता पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.