बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायब

घनसावंगी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने आत्मदहनाचा व्हिडीओ
बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायब
बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायबलक्ष्मण सोळुंखे

जालना : जिल्ह्यात district पोलिस Police दलातील नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदली transfer प्रक्रियेमध्ये बदली न झालेल्या घनसावंगी पोलिस Ghansawangi police ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने आत्मदहनाचा self immolation व्हिडीओ Video तयार करून, तो व्हिडियो सोशल मीडियावर social media व्हायरल Viral केला आहे. आणि तो पोलिस कर्मचारी गायब झाल्याचा प्रकार रात्री समोर आला आहे.

जालना जिल्ह्यात पोलीस दलात नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये आपली बदली न झाल्यामुळे घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून तो गायब झाला होता. रात्री या घडलेल्या प्रकाराने पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन, काही दिवसापूर्वी विनंती बदलीचा अर्ज केला होता.

हे देखील पहा-

मात्र, दोन ते तीन बदल्यांच्या यादी येऊन निघून गेली तरीदेखील, गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी काल सहा वाजेच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवले आहे. त्यामध्ये माझी आज संध्या काळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करणार आहे, असा इशारा देत ते गायब झाले आहेत.

बदली न झाल्यास आत्मदहनाच्या इशाऱ्याचा व्हिडिओ टाकून पोलीस हवालदार गायब
भाजपच्या माजी नगरसेवकाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

त्यांच्या या इशाऱ्यामुळे कुलकर्णी यांच्या शोधाकरिता पोलिसांची एकच धावपळ उडाली होती. जिल्ह्यात अशाच प्रकारच्या या अगोदर देखील मागील काही दिवसात बदनापूर आणि नेर सेवली पोलिस ठाण्यात ही असाच प्रकार घडला होता. नेमका जिल्हा पोलिस दलात आशा प्रकारच्या घटना वाढल्या असल्याने चर्चाना उधाण आले आहे. रात्री उशिरा पोलिसांना कुलकर्णी यांचा शोध लागल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणे अत्ता महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com