जालन्यातील महिलांची फसवणूक करणारा महाठग पोलिसाच्या जाळ्यात

जालना शहरात गेल्या काही दिवसात महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या.
जालन्यातील महिलांची फसवणूक करणारा महाठग पोलिसाच्या जाळ्यात
जालन्यातील महिलांची फसवणूक करणारा महाठग पोलिसाच्या जाळ्यातSaam Tv

जालना शहरात गेल्या काही दिवसात महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. औरंगाबाद शहरातील आरोपी अहेमद खान खलील अहमेद खान हा महिलांना दुबई येथील एका संस्थेमार्फत तुम्हाला मदत मिळून देतो म्हणून सांगत महिलांना शहरातील बँका समोर घेऊन जायचा.

बँकेसमोर आल्यावर तुमच्या अंगावर सोनं आहे. मॅनेजर सामोर हे घालून जाता येणार नसल्याचे सांगत महिलांच्या अंगावरील दागिने माझ्या जवळ ठेवा अस सांगून दागिने घेऊन पसार व्हायचा अशा घटना गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने घडत असल्याने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्हाचा तापस करण्याचे आदेश दिले होते.

जालन्यातील महिलांची फसवणूक करणारा महाठग पोलिसाच्या जाळ्यात
राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद...

त्यावरून त्यावरुन गुन्हे शाखेचे एक पथक सतत सदर घडलेल्या गुन्हयांचे शहरातील घटनास्थळाचे विश्लेषण करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की, कटकट गेट, औरंगाबाद येथे राहणारा आरोपी आसीफ अहेमद खान खलील अहमेद खान याने वरील प्रकारचे गुन्हे केले करत असल्याची माहिती त्यांच्या समोर आली असता गुन्हे शाखेच्या टीम ने आरोपी आसीफ अहेमद खान खलील अहमेद खान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी जालना शहरातील सादर बाजार, कदीम जालना आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात गुन्हे केल्याची कबुली दिल्या नंतर त्यांच्या विरुद्ध जालना शहरातील तीन पोलिस ठाण्यात कलम

1. सदर बाजार 495/2021 420,406 भादंवी

2.सदर बाजार 611/2020 420,406 भादंवी

3.सदर बाजार 608/2020 420,406 भादंवी

4.सदर बाजार 783/2020 420,406 भादंवी

5.सदर बाजार 616/2020 420,406 भादंवी

6.कदीम जालना 417/2020 420 भादंवी

7.चंदनझिरा 263/2021 420,406 भादंवी

प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर आरोपी वर जळगाव, वाशिम, औरंगाबाद शहर, बुलढाणा इत्यादी जिल्हयात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्याने एकच खबळ उडालीय, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपी आसीफ अहेमद खान खलील अहमेद खान याला सदर बाजार पोलिसाच्या ताब्यात दिले असून या प्रकरणी आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com