प्रेम, जबरदस्ती लग्न अन् पैशांची मागणी; नागपुरातील 'त्या' नवरा-बायकोला अटक

महेंद्रला तुरुंगवास झाल्यानंतर मेघालीने त्याची जेलमध्ये जाऊन भेट घेत त्याच्याकडे 4 लाखांची मागणी केली.
प्रेम, जबरदस्ती लग्न अन् पैशांची मागणी; नागपुरातील 'त्या' नवरा-बायकोला अटक
Nagpur CrimeSaam TV

नागपूर: नागपूर आणि नजिकच्या परिसरात आपलं सावज हेरुन त्यांच्याशी लग्न करुन घरच्यांना लुटणाऱ्या एका लुटारी महिलेला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. मेघाली तिजारे अस आरोपी महीलेच नाव असून तिचा खरा बॉयफ्रेंड मयूर मोटघरेला देखील पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मेघालीने नागपूरच्या (Nagpur Police) कळमना मार्केट भागातील भाजी विक्रेता महेंद्र मनवानीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर मेघालीने महेंद्रला आपल्यासोबत दुष्कर्म केल्याची धमकी देत त्याच्यासोबत लग्न केलं. महेंद्रने दबावाखाली येऊन मेघालीसोबत लग्न केल्यानंतर तिने काही काळातच हुंड्यासाठी मारहाण, अनैसर्गिक कृत्य, मारपीट करणं यासारख्या गुन्ह्यांमध्ये महेंद्र आणि तिच्या परिवाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात महेंद्रला तुरुंगवास झाल्यानंतर मेघालीने त्याची जेलमध्ये जाऊन भेट घेत त्याच्याकडे 4 लाखांची मागणी केली. यानंतर महेंद्रने आपल्या वडीलांना सांगून मेघालीला 2 लाख 10 हजार रुपये द्यायला सांगितले. जेलमधून बाहेर आल्यानंतर महेंद्रने जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्यावर आलेली आपबीती सांगितली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्याने चौकशी करत मेघाली आणि तिचा बॉयफ्रेंड मयूरला अटक केली आहे. तपासाअंती मेघाली आणि मयूरनेही लग्न केल्याचं निष्पन्न झालं आहे. या महिलेने आणखी कोणाला फसविले आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.