Yavatmal Crime News : कर्जाच्या बहाण्याने बचत गटाच्या महिलांची फसवणूक; पाेलिस तपास सुरु

पाेलिस या प्रकाराचा कसून तपास करीत आहेत.
money, yavatmal crime news, small saving groups
money, yavatmal crime news, small saving groupssaam tv

- संजय राठोड

Yavatmal Crime News : बचत गटातील महिलांना कर्जाचे अमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी काही महिलांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली आहे. (Maharashtra News)

money, yavatmal crime news, small saving groups
NEET परीक्षेतील 'त्या' प्रकरणावर राज्य महिला आयाेग आक्रमक; वैद्यकीय शिक्षण मंडळास दाेन दिवसांचा अल्टीमेटम (पाहा व्हिडिओ)

यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील दहेगाव इथे ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून बचत गटातील २५ ते ३० महिलांची प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेवंता उद्धव जिकार यांनी फसवणूक करणाऱ्या महिलेच्या विरोधात वडकी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

money, yavatmal crime news, small saving groups
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

कर्ज मिळून देण्याचं आमिष दाखवून ग्रामीण भागातील अनेक महिलांकडून दोन हजार रुपये घेऊन बचत गटातील महिलांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. पाेलिस या प्रकाराचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com