महाडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल

महाड पोलिसांनी पुढील काळात येणाऱ्या सणांच्या अनुषंगाने शहरात एखादी अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासन कसे तत्पर घटनास्थळी पोहचून घटना हाताळले याचे प्रात्यक्षिक सादर केले.
महाडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल
महाडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिलराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड :  कंट्रोल रूमद्वारे महाड पोलिसांना आणि इतर शासकीय यंत्रणांना महाड शहरातील क्रांती चौकात अपघात झाला आहे. अपघातानंतर जमावात दंगा पसरल्याची खबर देण्यात आली. महाड पोलीस, अग्निशमन दल, महसूल यंत्रणा ह्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. Police mockdrill in Mahad

हे देखील पहा -

पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणून जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दंगलीची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. चर्चा सुरू झाली मात्र नंतर कळलं की ही खरीखुरी दंगल नाही तर महाड पोलिसांनी केलेलं हे मॉकड्रिल आहे !

महाडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल
कोरोना काळात दोनशे मुलांना मोफत शिक्षण देणारी शाळा

महाड पोलिसांनी पुढील काळात येणाऱ्या हिंदू, मुस्लिम धर्मियांच्या सणांच्या अनुषंगाने शहरात एखादी अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासन कसे तत्पर घटनास्थळी पोहचून घटना हाताळले याबाबत मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक केले होते. यावेळी पोलीस, महसूल, अग्निशमन दल यंत्रणा ह्या एखादी दुर्घटना, अपघात, दंगल घडली की किती वेळात येतात, उद्भवलेली परिस्थिती प्रशासन कशी हाताळून नियंत्रणात आणतात याची प्रात्यक्षिके पोलिसांमार्फत करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com