Nagpur Crime : पोलिसांनी पकडली रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी!

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी 11 किलो 940 ग्रॅम गांजा विशाखापट्टणम - न्यू दिल्ली एक्सप्रेसमधून केला जप्त केला आहे. याची किंमत आहे 1 लाख 19 हजार 400 रुपये इतकी आहे.
Nagpur Crime : पोलिसांनी पकडली रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी!
Nagpur Crime : पोलिसांनी पकडली रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी!Saam Tv

मंगेश मोहिते

नागपूर : रेल्वेमधून अवैध पद्धतीने गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. यावर आळा बसावा यासाठी नागपूरच्या स्थानिक लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने हि तस्करी रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले होते.

हे देखील पहा :

नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे गुप्त माहिती आली की विशाखापट्टणम - न्यू दिल्ली या नागपूर वरून जाणाऱ्या रेल्वेगाडी मधून अवैधरित्या गांजा नेला जात आहे. पोलिसांनी हा गांजा पकडण्यासाठी सापळा रचला. ही गाडी जेव्हा नागपूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आली त्यावेळी पोलिसांनी या ट्रेनमध्ये झाडाझडती घ्यायला सुरूवात केली.

Nagpur Crime : पोलिसांनी पकडली रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी!
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत फरक : नाना पटोले

तेव्हा तिथे एक बेवारस बॅग आढळून आली. ती बॅग जप्त करत त्याची तपासणी केली असता त्यामधून अकरा किलो 940 ग्रॅम गांजा आढळून आला पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. मात्र, आरोपीला पकडण्यात आले नाही. अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे. पण अश्या प्रकारे अवैधरित्या गांजाची तस्करी रेल्वे प्रवासी गाड्यांमधून केली जात असल्याने यावर आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com