जुन्या वादातून पाेलिसाचा झाला मर्डर; शहरात उडाली खळबळ

या घटनेमुळे शहरात सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली.
yavatmal, police
yavatmal, policesaam tv

- संजय राठाेड

Yavatmal : यवतामळ जिल्ह्यातील अवधुतवाडी पाेलिस (police) ठाणे हद्दीत एका पाेलिस कर्मचा-यास चक्क पाेलिस मुख्यालयातच मारल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत पाेलिस कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाेलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे शहरात सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली.

निशांत खडसे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आला असता अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्याालयाच गेट जवळ आले आणि त्याची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांची आणि पोलीस मुख्यालय जवळच अशी घटना घडत असेल तर नक्कीच पोलीस खात्याासाठी ही बाब गंंभीर आहे अशी ही चर्चा शहरात आहे.

Edited By : Siddharth Latkar

yavatmal, police
Video : वेदांतानंतर 'हा' प्रकल्प जाणार महाराष्ट्राबाहेर ? सरकारनं गमावली एक लाख काेटींची गुंतवणुक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com