अकोल्यात बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; दारुसह साहित्य जप्त

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज केली आहे.
Akola News
Akola NewsSaam Tv

अकोला - बेलुरा खुर्द येथील एका बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी बनावट दारुसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) चौघांना अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज केली आहे.

हे देखील पाहा -

पोलिसांनी अकोल्यातील बेलुरा गावात काही जण बनावट दारू बनवून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता बनावट दारू बनविताना चार जण आढळून आले. बाटली भरल्यानंतर दारूच्या खोक्यामध्ये भरून शहरातील दुकानांमध्ये गाव खेड्यावर सर्रास विक्री केली जात होती.

Akola News
लग्नानंतर गूगलवर या विचित्र गोष्टी सर्च करतात महिला; उत्तर वाचून तुम्ही व्हाल थक्क

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करून त्यांच्या कडून बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मशीन यासह कच्चा माल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट अलकोहोल, फ्लेवर, खाली बोट्ल, 2 मशीन यासह मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे विलास पाटील यांच्यासह पथकाने केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com