
अहमदनगर: नगर (Ahmednagar) पोलिसांनी एका गोदामातून लपवून ठेवलेला ७ टन ६६० किलो वजनाचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी ८३ लाख एवढी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी (Police) केली आहे.
या कारवाईत एका आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत. काही दिवसापूर्वी आलेल्या दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन चर्चेत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगर एमआयडीसी (MIDC) हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोदामामध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवले, असल्याची माहिती सहायक निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून खात्री केली असता, गोदामामध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सुमारे सात टन रक्तचंदन सापडले.
या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी २५ लाख रुपये एवढी किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हे रक्तचंदन कुठून आले, कसे आले याचा तपास केला जाईल, असंही पोलीस म्हणाले. या अगोदही सांगली पोलिसांनी (Police) मोठी कारवाई करत कोट्यवधींचे रक्तचंदन जप्त केले होते. हे रक्तचंदन कर्नाटकातून आळ्याची माहिती पुढे होती.
रक्तचंदन तस्करीत मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले आहे. तस्करीत आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.