अबब...! एकाच दुचाकीवर सहा जण; पोलीसही चक्रावले 

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये दुचाकीवर किती जणांनी प्रवास करावा याला बंधन नसल्याचे वारंवार सोशल मीडियावरील चित्रातून स्पष्ट झाले आहे.
अबब...! एकाच दुचाकीवर सहा जण; पोलीसही चक्रावले 
अबब...! एकाच दुचाकीवर सहा जण; पोलीसही चक्रावले सागर आव्हाड

सागर आव्हाड

सोलापूर - महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये दुचाकीवर किती जणांनी प्रवास करावा याला बंधन नसल्याचे वारंवार सोशल मीडियावरील चित्रातून स्पष्ट झाले आहे. मात्र,सोलापूर रस्त्यावर  दुचाकीवर चक्क सहाजण आणि त्यातील चौघे विनामास्क होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत, त्याची पोलीस यंत्रणेकडून अंमलबजावणी केली जात आहे. Police Social media Mask

हे देखील पहा-

पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही हे महाशय त्याची पत्नी, दोन मुले टाकीवर, एक दोघांच्या मधे, तर एक त्या महिलेच्या काखेतील झोळी मध्ये असा सहा जणांचा प्रवास पाहून चक्क पोलीसही चक्रावले आहे.रेसकोर्स पोलीस चौकीजवळ पोलिसांनी हात केल्यानंतर दुचाकीचालकाने वाहन थांबवले. हे पाहताच चिमुकल्याने शर्ट ओढून तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मास्क Mask वापरा. धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका, आम्हाला कारवाई करण्यात समाधान वाटत नाही.

अबब...! एकाच दुचाकीवर सहा जण; पोलीसही चक्रावले 
एकाच वेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचारी निलंबीत !

मात्र, तुमच्या अशा बेजवाबदारपणामुळे कारवाई करावी लागते. तुमच्या चुकीची शिक्षा या लहान मुलांना देऊ नका, असाही सल्ला त्यांनी या दुचाकीचालकाला दिला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना महामारीचा जोर कमी झाल्याने कडक निर्बंध हे शिथील करण्यात येत आहेत. यामुळे व्यवसाय- उद्योग आणि कंपन्या थोड्या प्रमाणात सुरू झाले आहे. त्यामुळे कामगारवर्ग आता दुचाकीवर कामाच्या ठिकाणी ये- जा करत आहे. ग्रामीण भागामधील मंडळीही खरेदी- विक्रीसाठी आता शहरामध्ये येऊ लागली आहेत. रस्त्यावर वाहनांची वर्दळ देखील वाढत आहे. Police Social media Mask

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com