पोलीस पुत्राच्या खुनाचा 12 तासात उलगडा; 3 आरोपींना बेड्या

तसेच त्यास ‘एमपीडीए’ अन्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.
पोलीस पुत्राच्या खुनाचा 12 तासात उलगडा; 3 आरोपींना बेड्या
पोलीस पुत्राच्या खुनाचा 12 तासात उलगडा; 3 आरोपींना बेड्याSaam Tv

सागर गायकवाड

नाशिक शहरातील म्हसरूळ आडगाव रोडवरील रोहिणी हॉटेल परिसरातील मोकळ्या पटांगणात काल झालेल्या पोलिस पुत्राच्या खुना प्रसंगी अवख्या 12 तासात म्हसरूळ पोलिसांनी 3 आरोपींना अटक करीत आरोपीच्या मुसक्या अवळल्या आहे. हा खून वर्चस्वाच्या वादातून प्रविण काकडचा काटा काढल्याप्रकरणी दोघांना ओझरमधून तर तिसऱ्यास खासगी रुग्णालयात उपचार घेताना अटक करण्यात आली आहे. तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संदीप उर्फ लेप्टर सुरेश त्रिभुवन, महेंद्र उर्फ विरु सुरेश अभंग, स्वप्नील दत्तात्रय पाटील अशी तिघांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की प्रविण गणपत काकड हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध पंचवटी, म्हसरुळ पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यास ‘एमपीडीए’ अन्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.

पोलीस पुत्राच्या खुनाचा 12 तासात उलगडा; 3 आरोपींना बेड्या
बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

म्हसरुळमधील स्मशानभूमी परिसरात पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तो मध्यवर्ती कारागृहात होता. ११ दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर पडला होता. रविवारी रात्री त्याचावर प्राणघातक हल्ला झाल्याचे कळताच सहायक आयुक्त मधुकर गावीत, वरीष्ठ निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी, सहायक निरीक्षक विनायक आहिरे, सुधीर पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवरील घटनास्थळी धाव घेतली. प्रविणचा या घटनेत मृत्यू झाल्याने तातडीने तपासास प्रारंभ करण्यात आला. हद्दीत वर्चस्व ठेवण्याच्या वादातून मित्र स्वप्नील पाटील तसेच दोन साथीदारांनी हे कृत्य केल्याची माहिती म्हसरुळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती.

म्हसरुळ पोलिस संशयितांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे गणेश रेहरे, दिनेश गुंबाडे यांना दोघे संशयित ओझरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार विष्णू हळदे, गणेश रेहरे, दिनेश गुंबाडे, प्रशांत देवरे, राठोड यांनी ओझर गावमध्ये सापळा रचून संदीप उर्फ लेप्टर सुरेश त्रिभुवन , महेंद्र उर्फ विरु सुरेश अभंग यांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. तर या हल्ल्यात हाताला दुखापत झाल्याने उपचार घेणारा स्वप्नील दत्तात्रय पाटील यास खासगी रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com