संगमनेरात पोलिसांनी रोखला बालविवाह

संगमनेरात पोलिसांनी रोखला बालविवाह
बालविवाहSaamTv

अहमदनगर : कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने रोखण्यात आला. मुलीच्या आई-वडिलांना बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देत समज देण्यात आली.
कौठेकमळेश्वर येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह सुकेवाडी ( ता. संगमनेर ) येथील युवकाशी ठरविण्यात आला होता. मात्र, याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे व ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेवून बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देण्यात आली. Police stopped child marriage at Sangamner

बालविवाह
राष्ट्रीय महामार्गावर तुमच्यावरही पडते का अशी "टोलधाड"

मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा मुलीच्या आई - वडिलांचा तसेच मुलीचा लेखी जबाब लिहून घेण्यात आला. प्रसंगी संगमनेर तालुका पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते, उपसरपंच नवनाथ जोंधळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, रामदास भडांगे, वाल्मिक जोंधळे, पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक राजेंद्र पालवे, ओंकार शेंगाळ उपस्थित होते. Police stopped child marriage at Sangamner abn79

पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनास माहिती मिळाल्यानुसार सतर्कता बाळगत बालविवाह रोखण्यात यश आहे. मुलीचा बालविवाह करणार नाही, अशी लेखी हमी आई - वडिलांकडून घेण्यात आली आहे.
- सुरेश मंडलिक, ग्रामविकास अधिकारी - ग्रामपंचायत, कौठेकमळेश्वर

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com