पोलीस उपनिरीक्षक पतीने गर्भवती पत्नीच्या पोटात मारली लाथ

गर्भवती पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात देखील झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पतीने गर्भवती पत्नीच्या पोटात मारली लाथ
पोलीस उपनिरीक्षक पतीने गर्भवती पत्नीच्या पोटात मारली लाथSaam Tv

सोलापूर: ‘गर्भात वाढणारे मूल हे माझे नसून मला हे मुल नको आहे तू काढून टाक,’ असे म्हणत पत्नीचा गळा दाबत तिच्या पोटावर पतीने (पोलीस उपनिरीक्षक) जोरात लाथ मारली असून महिलेच्या दिराने तिचा विनयभंग केला आहे. पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार, सात जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी २०२० मध्ये मुंबई मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आरोपी पतीसोबत कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी आपल्या पत्नीला मुंबई येथे घेऊन गेला. तेथे कित्येक दिवस पत्नी सोबत आनंदाने राहिला. त्यानंतर, महिलेच्या सासू, सासरे, दीरानी छोट्या-छोट्या कारणांवरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली तिला रोजच उपाशी ठेवू लागले. दरम्यानच्या काळात दिराने वाईट हेतूने महिला पीडितेचा विनयभंग केला. पतीने पत्नीला सोलापूर येथे माहेरी सोडून जाताना पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ देखील केली.

पोलीस उपनिरीक्षक पतीने गर्भवती पत्नीच्या पोटात मारली लाथ
साखर घोटाळ्याप्रकरणी; वैद्यनाथ बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी गजाआड

दरम्यान, लग्नाच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या चुलत सासऱ्यानेही त्यावेळी विविध जाचक अटी-शर्ती घातल्या. या आशयाची फिर्याद पीडित महिलेने सोलापुर पोलीस ठाण्यात दिली आहे. हे मूल माझे नाही, तुझे कोणाबरोबर तरी लफडं आहे, असे म्हणत पिदितेच्या चारित्र्यावर संशय घेत, पीडितेचा गळा दाबून आरोपीने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गर्भवती पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात देखील झाला आहे. त्यानंतर, पतीने पत्नीला सोलापूर येथे माहेरी आणून सोडले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com