सांगलीत मंगलकार्यालयांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगलकार्यालयांवर कारवाई सुरु आहे.
सांगलीत मंगलकार्यालयांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा
सांगलीत मंगलकार्यालयांवर पोलिसांचा कारवाईचा बडगाविजय पाटील

सांगली : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने सांगली आणि मिरजेतील मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सांगलीत संयुक्त पथकाने दोन मंगल कार्यालय तर मिरजेत महापालिकेने एका कार्यालयावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात 19 जुलै अखेरपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महापालिका क्षेत्रात सहायक आयुक्तांनी सांगली आणि मिरजमधील अनेक मंगल कार्यालयांची पाहणी केली.

सांगलीत मंगलकार्यालयांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा
'ग्यानबा-तुकाराम' च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

यामध्ये सांगली वाडी येथेही दोन मंगल कार्यालयात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक लोक आढळून आल्याने या ठिकाणी मंगल कार्यालय चालकांना प्रत्येकी 15 हजाराचा दंड आकारण्यात आला. तर मिरजमधील शाही दरबार हॉलवर सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याबद्दल 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मिरजेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.