तरुणाने काढला गावठी कट्ट्यासह फोटो; पोलिसांनी केली अशी कारवाई
तरुणाने काढला गावठी कट्ट्यासह फोटो; पोलिसांनी केली अशी कारवाई saam tv

तरुणाने काढला गावठी कट्ट्यासह फोटो; पोलिसांनी केली अशी कारवाई

भूषण अहिरे

धुळे - चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाला गावठी कट्ट्यासह काढलेला फोटो सोशल मीडिया (Social Media) वरती व्हायरल करण चांगलच महागात पडल आहे. धुळे (Dhule) शहरातील कबीरगंज (kabirganj) परिसरात राहणाऱ्या मोमीन शेख (Momin Shaikh) या युवकाने आपल्याजवळ असलेला गावठी कट्टा बरोबर फोटो काढून तो फेसबुक वरती व्हायरल केला. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांनी माहिती दिली आहे. (Police took action after the boy shared a photo with a village pistol)

तरुणाने काढला गावठी कट्ट्यासह फोटो; पोलिसांनी केली अशी कारवाई
ट्विटर नरमले; विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी पदी नियुक्ती

याबाबतची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या (chalisgaon road Police station) वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील (Sandip Patil) यांनी तात्काळ एक पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी रवाना केले.

संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना एक संशयीत मिळून आल्यानंतर यास विचारपूस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संबंधित तरुणाने आपल्याकडे असलेला गावठी कट्टा पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गावठी कट्टा बाळगल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव रोड पोलिस करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com