एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजकीय भूकंप, काँग्रेसमध्ये 'सौम्य धक्के'

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी १७ आमदारांसह बंड केले असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Congress
Maharashtra CongressSaam Tv

नागपूर: भाजपने (BJP) विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) १७ आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Eknath Shinde latest News)

राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसाठी महाराष्ट्र सदन मधील ४० खोल्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळत आहेत. नागपुरातून मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

Maharashtra Congress
Breaking: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला, त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले होते, पण आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत रवाना होण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसात महाराष्ट्रात सत्तापाटल होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेतृत्व आमदारांना नेमका कोणता संदेश देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना काँग्रेसमधीलही काही आमदार फुटले असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसने (Congress) सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde latest News)

Maharashtra Congress
आम्ही सत्तेसाठी कधीही…”; एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेनेने (Shivsena) एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)

दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com